सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
शाळा किरवली येथे केंद्रप्रमुख नारायण सोनवणे,केंद्र वैजनाथ यांनी” वीर हुतात्मा भाई कोतवाल केंद्रीय गुणवत्ता कक्ष “सन २०१४ रोजी २ डिसेंबरला या कक्षेची स्थापना करून विविध नावीन्यपूर्ण नवनवीन उपक्रम उपकृत करून विभाग स्तर पर्यंत सुयश संपादन केलेले आहे.
हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराजी पाटील यांच्या ७८ ब्या बलिदान दिनाच्या स्मरणार्थ तालुका स्तरीय २ जानेवारीला” उत्कृष्ट फलक लेखन “स्पर्धांचे आयोजन केले होते . या मध्ये ५३ शाळांनी सहभाग घेतला.त्यातील विजेत्या शिक्षक,शाळांचा सन्मान तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री दौंड साहेब व उपस्थिती बी आर सी चे तज्ञ अधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
खालील शिक्षकांचा सन्मान करून शुभेच्छा देण्यात आले. श्री सदाशिव ताताब्या बांबले शाळा पलसधरी ठाकूरवाडी, सौ अर्चना संतोष देशमुख शाळा पाली.का वाडी,श्री कृष्णा मारुती उंबरे शा.भालीवडी, श्री जितेंद्र अशोक कांबळे शाळा वाघिणीचीवाडी,श्री राहुल बळीराम जोगदंड शाळा वाकस,श्री संजय अष्टेकर शाळा मांडवणे,श्री लक्ष्मण जानू ढेबे,शाळा वीर हुतात्मा भाई कोतवाल विद्यामंदिर माथेरान,श्री ज्ञानेश्वर सुका वाडीले शाळा वर्णे ठाकूरवाडी,सौ क्रांती नितीन थळे शाळा भोईरवाडी .या शिक्षक_शाळांचा सन्मान उपस्थित अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
रायगड भूषण नारायण सोनवणे माथेरान यांनी या पूर्वी वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या बलिदानावर इतिहासाचे वास्तव लेखन करून जवळजवळ चार पुस्तकांचे प्रकाशन केलेले आहे.त्यांची हुतात्मा व क्रांतिवीर बद्दल असणारी तळमळ वाखण्यासारखी आहे. सदर उपक्रम अंतर्गत शाळांनी विद्यार्थ्याना अधिक हुतात्माबद्दल प्रेरणा देण्याचा उद्देश सफल केला आहे.सहभागी शाळांचे आभार रायगड भूषण नारायण सोनवणे यांनी मानले.








Be First to Comment