Press "Enter" to skip to content

बोरघाट वाहतुक पोलीसांचा आगळा वेगळा उपक्रम

अपघातग्रस्त वाहन प्रदर्शनातून प्रबोधन

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

हौस आणि प्रसंगी खिशाला काञी लावत घेतलेले वाहन जर रस्ता सुरक्षा नियमाचे पालन न करता चालवले तर जीव तर जातो पण वाहन भंगार कसे होते याचे परिणामकारक उदाहरण बोरघाट वाहतुक पोलीसानी प्रदर्शनातून दाखवून दिले.

32व्या रस्ता सुरक्षा अभियानासुरू असून वाहतुक पोलीस अपघात कमी होण्यासाठी अभिनव उपक्रम राबवित  आहेत.गुरूवारी  32 व्या रस्ता सुरक्षा अभियान 2021 निमित्ताने  द्रुतगती मार्गावरील आफकोन कम्पनीचे अभियंते, कामगार, मजूर याना रस्ता सुरक्षा अभियानाचे महत्व पटवून देण्यात आले.सडक सुरक्षा – जीवन सुरक्षा या घोषवाक्याप्रमाणे दुचाकिस्वारानी हेल्मेट चा वापर करणे ,चारचाकी चालविताना  सिट बेल्ट लावणे, वेगावर नियंत्रण ठेवणे,रस्त्यावर वाहन उभे न करणे,दारु पिऊन वाहन न चालवणे, वाहन चालविताना मोबाइलवर न बोलणे, दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट प्रवास न करणे याबाबत माहिती देऊन  वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबतचे बॅनर्स दर्शनी भागावर वाहतुक पोलीसांकडून लावण्यात आले.

अपघातग्रस्त वाहने पाहून तरी चालकाला नियमाचे पालन करण्याची सुबुद्धी साठी ठेवलेली वाहन.

तसेच अपघाता बाबत जनजागृती व्हावी या  उद्देशाने अपघात ग्रस्त कार आणि मोटारसायकल अशी वाहने अमृतांजन ब्रिज या ठिकाणी दर्शनी भागावर ठेवून त्या अनुषंगाने बॅनर्स लावून वाहन चालकामध्ये जनजागृती करण्याचा उपक्रम सुरू आहे.

वरिष्ठांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजनेतून  2020मध्ये अपघात पन्नास टक्के कमी आणले.आता रस्ता सुरक्षा अभियानातून अपघात प्रमाण आणखी  कमी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

स पो निरीक्षक परदेशी म.पो. केंद्र बोरघाट

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.