सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील विंधणे येथिल जेष्ठ समाजसेवक स्व. धाया बाळू जोशी व रुक्मिणी धाया जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ साई कन्स्ट्रक्शनचे मालक पी. डी. जोशी यांनी बांधलेल्या विंधणे प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या व सभागृहाचे उदघाटन उरणचे सभापती सागर कडू यांच्या उपस्थितीत पी. डी. जोशी व त्यांच्या पत्नी मिनाक्षी जोशी यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात करण्यात आले.
विंधणे येथिल प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली होती.विद्यार्थ्यांना गळक्या छपराखाली जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत होते.शासकीय निधीतून काही वर्गखोल्या बांधल्या गेल्या असल्या तरी त्या पुरेशा नसल्याने तीन वर्गखोल्या व सभागृहाचे बांधकाम विंधणे गावातील दानशूर व्यक्तिमत्त्व व साई कन्स्ट्रक्शनचे मालक पी डी जोशी यांनी लाखो रुपये खर्चून पूर्ण केले आहे.आज या वर्गखोल्या नि सभागृहाचे उदघाटन शाळा समितीने पी डी जोशी व त्यांच्या पत्नी मिनाक्षी जोशी यांच्या हस्ते केले.

त्यावेळी उरण पंचायत समितीचे सभापती सागर कडू यांची उपस्थिती आवर्जून होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात सागर कडू यांनी आपले विचार व्यक्त करताना,सध्या प्रतिष्ठा जपण्यापेक्षा मुलांना संस्कारित करणारे शिक्षण देणे गरजेचे असल्याचे मौलिक मत व्यक्त केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्रगधरा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी पं स सदस्या वैशाली पाटील, उपसभापती शुभांगी पाटील, गटशिक्षणाधिकारी अंजने यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी पं स च्या उपसभापती शुभांगी पाटील,जि प सदस्या कुंदा ठाकूर,मिनाक्षी जोशी, वैजनाथ ठाकूर,पं स सदस्य हिराजी घरत,वैशाली पाटील, दिशा प्रसाद पाटील,गट शिक्षणाधिकारी अंजने,संगीता चंदने,अभिजीत मटकर,पी जी म्हात्रे,प्रमोद शेळके,चंद्रकांत म्हात्रे, मनिषा कोळी,विद्या पाटील, शेडगे,आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment