Press "Enter" to skip to content

गुन्हे शाखा कक्ष 2ची मटका जुगार खेळणाऱ्यावर धडक कारवाई

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

बेकायदेशीर रित्या मटका जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर गुन्हे शाखा कक्ष 2 आणि पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई करून सहा जणांना ताब्यात घेतले असून या गुन्ह्यात वापरलेली रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि इतर साहित्य असा मिळून एकूण 2 लाख 61 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

शहरातील सोसायटी नाका गांधी हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलाखाली बेकायदेशीर रित्या मटका जुगार खेळले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीधर गोरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस. आर.ढोले व त्यांच्या पथकाने छापा टाकून मुख्य आरोपी कन्हैय्या गर्जे यांच्यासह इतर सहा जणांना या पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध कि. प्रो.को.कलम 41 (1) (अ) अन्वये कारवाई केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.