Press "Enter" to skip to content

शिरवली येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील शिरवली या गावी गावचे माजी पोलिस पाटील स्व.विठोबा तुकाराम पोटफोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे निमित्ताने शनि. दि.२३ व रवि. दि.२४ रोजी त्यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

माजी पोलिस पाटील तथा तालुका पो.पाटील संघाचे माजी अध्यक्ष, द.ग.तटकरे यांचे विश्वासू सहकारी म्हणून विशेष ओळख असणाऱ्या स्व.माजी पोलिस पाटील विठोबा तुकाराम पोटफोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून त्यांच्या परिवाराचे वतीने शनि.दि.२३ रोजी सायं.६ वा.प्रसिद्ध दत्त सेवि मंडळ वरप-पेण यांचे संगितमय हरिपाठ,रात्रौ ९ वा.नवतरुण मित्रमंडळ खांब पंचक्रोशी यांचे जागर भजन तर रवि.दि.२४ रोजी स.९ ते १० वा. पुण्यस्मरण,१० ते १२ प्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. गणेशमहाराज शिगवण, खेड यांची हरिकिर्तन सेवा व तद्नंतर महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न होणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी घ्यावा असे अवाहन पोटफोडे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.