सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।
बदलत्या राजकारणात पुन्हा पुन्हा निवडून येणे कठीण बनले असतानाही चाणजे ग्रामपंचायतीमधील बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून समजल्या जाणार्या मंगेश थळी यांनी सलग 6 वेळा निवडून येऊन विजयी षटकार मारीत आगळावेगळा विक्रम केला आहे.
मंगेश थळी यांचे माजी आमदार मनोहरशेठ भोईर व इतर पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे. सलग 5 वेळा निवडून आलेले मंगेश थळी पुन्हा एकदा निवडुन रिंगणात उतरले होते. त्यांच्या विजयाचा रथ रोखण्यासाठी विरोधकांनी जंगजंग पछाडले होते. परंतु या सर्वांना पुरून उरत सलग 6 वेळा निवडून येत आपली विजयाची मालिका सुरूच ठेवण्यात यशस्वी झाले.
चाणजे ग्रामपंचायतीमध्ये सलग 5 वेळा निवडून येऊनही मंगेश थळी यांना ग्रामपंचायतीचे कोणतेही पद मिळेल याची अभिलाषा बाळगली नव्हती. परंतु आता पुन्हा सहव्यांदा निवडून येऊन विजयी षटकार मारला आहे. त्यामुळे यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मंगेश थळी यांच्या नावाचा विचार करून ग्रामपंचायतीमध्ये यथोचित मान देऊन सन्मान करण्यात यावा अशी मागणी शिवसैनिक व ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.








Be First to Comment