Press "Enter" to skip to content

पागोटे येथे रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी केले रक्तदान

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । प्रतिनिधी ।

१९८४ च्या उरण येथील झालेल्या शेतकरी आंदोलनात झालेल्या पाच हुतात्म्यांना श्रध्दांजली म्हणून पागोटे येथील जाणता राजा कला ,क्रीडा , सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने पागोटे येथील प्राथमिक शाळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

या शिबिराचे उद्घाटन पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच अॅड.भार्गव पाटील ,उरण सामाजिक संस्थेचे संतोष पवार ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील,चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण चे अध्यक्ष विकास कडू ,जानता राजा कला ,क्रीडा, सामाजिक मंडळाचे अध्यक्ष विवेक पाटील,पंकज पाटील,विशाल ठाकूर, जितेंद्र पाटील, रोशन ठाकूर ,उमेश पाटील मान्यवर उपस्थित होते.

या शिबिरास माजी आमदार मनोहरशेठ भोईर ,जिल्हापरिषद सदस्य विजय भोईर ,कामगार नेते महेंद्र घरत ,भाजप नवघर अध्यक्ष जयप्रकाश पाटील आदि मान्यवरांनी भेट दिली .

या शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय उपक्रमास हातभार लावला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.