सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
कैरे गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेने रस्ता खराब झाला होता.येथील रस्त्याची दुरुस्ती व्हावी नागरिकांनी माजी उपसरपंच सुरेश पाटील यांच्या मागे तगादा लावला होता.नागरिकांच्या समस्येचे निवारण व्हावे यासाठी सुरेश पाटील यांनी आपली पत्नी जिल्हा परिषद सदस्य पद्माताई पाटील यांच्याकडे व्यथा मांडून पाठपुरावा केला.
अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने वडगाव जिल्हा परीषद सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या जि.प.शेष फंडातुन चंद्रकांत जंगम यांच्या घरापासुन ते तानाजी पाटील यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लाॅक रस्ता दुरुस्तीच्या कामाचे उदघाटन जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील यांच्या हस्ते पार पडला.त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य जयश्री पाटील, नंदकुमार पाटील, हरेश पाटील तसेच ग्रामस्थ भगवान पाटील, रमेश पाटील, नारायण पाटील, संभाजी पाटील, गजानन पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.








Be First to Comment