सिटी बेल लाइव्ह । उरण । घनश्याम कडू ।
स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षाचालक-मालक संघटना बेलपाडा यांच्या नामफलकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले.
पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील तसेच चालक-मालक संघटनेचे संस्थापक रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील सर, जेएनपीटीचे माजी ट्रस्टी रवी पाटील, दीपक ठाकूर व ग्रामपंचायत सदस्य शिल्पा कडू, किरण कडू व सर्व रिक्षाचालक मालक संघटनेचे सभासद उपस्थित होते.

संघटना स्थापन करणे सोपे असते परंतु ती चालविणे कठीण आहे. काहीजण खो घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन संघटना स्थापन केलीत हे चांगले झाले. प्रवाशी हे तुमचे दैवत आहेत. त्यांना प्रवासभाडे हे योग्य लावावेत जेणेकरून ते नाराज होणार नाहीत याकडे लक्ष द्यावेत. तुम्ही असेच एकसंघ राहून प्रगती करा असा संदेश माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी नामफलकाच्या अनावरण प्रसंगी रिक्षा चालक मालकांना दिला.








Be First to Comment