Press "Enter" to skip to content

उरणमध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश तर भाजपाची पीछेहाट

सरपंच पदाच्या आरक्षणा नंतरच चित्र होईल स्पष्ट

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले तर भाजापाची पीछेहाट झाली आहे. मात्र काही ठिकाणी काठावर बहुमत मिळाले असल्याने सरपंच पदाचे आरक्षण झाल्यानंतरच ग्रामपंचायतीवर सरपंच कोणाचा बसणार हे समजेल, तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. विजयी उमेदवारांचे नेतेमंडळीकडून व ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.

उरण तालुक्यातील चाणजे, नागाव, केगाव, म्हातवली, फुंडे व वेश्वि या ६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. मतमोजणीस आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली. निकालानंतर महाविकास आघाडीने घवघवीत यश सपन्न केले तर भाजपाची पीछेहाट झाल्याचे दिसत आहे.
नागावमध्ये ११ जागांपैकी ३ शिवसेना, २ शेकाप, ३ भाजपा तर ३ गाव आघाडी, म्हातवलीमध्ये ११ जागांपैकी ६ महाविकास आघाडी, ५ भाजपा, चाणजेमध्ये १७ जागांपैकी ९ महाविकास आघाडी, ८ भाजपा, केगाव ११ जागांपैकी ११ महाविकास आघाडी, १ भाजपा, फुंडेमध्ये ९ जागांपैकी ७ महाविकास आघाडी, २ भाजपा, वेश्विमध्ये ९ जागांपैकी ६ भाजपा, ३ महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.

निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले असून भाजपाची पीछेहाट झाल्याचे दिसून येते. परंतु सरपंच पदाचे आरक्षण येत्या २२ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. त्या आरक्षणा नंतरच कोण बाजी मारतो याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.