Press "Enter" to skip to content

उरण विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व

उरणच्या १६ पैकी १३ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

उरण विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये शिवसेना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, शेकाप माजी आमदार विवेक पाटील, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, राष्ट्रवादी कॉग्रेस सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये महाविकासआघाडीने १६ पैकी १३ ग्रामपंचायतीवर विजयी मिळवून स्पष्टपणे महाविकास आघाडीने वर्चस्व केलेले आहे.

यामध्ये उरण तालुक्यामध्ये चाणजे, केगांव, नागांव, म्हातवली, फुंडे तर पनवेल तालुक्यामध्ये खानावळे, बारवई, देवळोली, सांगुर्ली, साई, कोळखे, आपटा, नानोशी या ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने सत्ता संपादन केलेली आहे, तर भारतीय जनता पार्टीला जनतेने स्पष्टपणे नाकारलेले आहे.

विजया बद्दल प्रतिक्रिया देताना माजी आमदार मनोहरशेठ भोईर म्हणाले कि ज्या विश्वासाने मतदार राजाने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देऊन विश्वास ठेवला आहे. त्याला कोणताही तडा जाणार नाही तसेच महाविकासआघाडी सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामे उरण मतदारसंघामध्ये करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.यातील बारवई,खानावले देवलोली या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी तालुकाध्यक्ष रघुनाथ पाटील,तालुका संपर्कप्रमुख अनंता पाटील,गुलसुंदे विभाग संपर्कंप्रमुख मोहन लबडे,माजी उपसभापती देविदास पाटील, निलेश बाबरे,पोयंजे पंचायत समिती विभागप्रमुख नितिन पाटील आदींनी परिश्रम घेतले.

या भरघोस यशाबद्दल माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन व सर्व मतदार बंधू-भगिनींचे नतमस्तक होऊन आभार मानले आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीमध्ये विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले महाविकासआघाडीच्या त्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकारी व लोकप्रतिनिधीचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी आभार मानले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.