Press "Enter" to skip to content

खांब च्या 9 पैकी 9 जागा राष्ट्रवादीला, ग्रामपंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा

सिटी बेल लाइव्ह । गोवे कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यात १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणूक संपन्न झाली असून सोमवार दि.१८ जानेवारी रोजी याचा निकाल जाहीर झाला असून खांब ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत परिवर्तन गाव विकास आघाडीला धूळ चारत या ठिकाणी पुन्हा एकदा मतदार बंधुभगीणींनी एकच वादा आमचा भाई दादा हे दाखवून देत उमेदवार मनोज भाई शिर्के,रामचंद्र चितळकर,प्रकाश थिटे, यांच्या नेतृत्वाखाली या ग्राम पंचायतीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला तर काही उमेदवारांच्या डिपॉजित देखील जप्त झाल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण तालुक्याच्या नजरा लागलेल्या या खांब ग्राम पंचायत मध्ये काही तरी बदल घडेल या शर्तीने परिवर्तन गाव विकास आघाडीने भाई मनोज शिर्के यांच्या विरोधात आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले मात्र रायगडचे खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री ना अदिती ताई तटकरे,आ अनिकेतभाई तटकरे यांनी या ग्राम पंचायत मध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर तसेच जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर प्रकाश थिटे भाई मनोज शिर्के यांनी आज पर्यंत ग्राम पंचायतीच्या व गावकारभारात दिलेल्या योगदानाला खऱ्या अर्थाने मतदार बंधूनी भरभरून प्रतिसाद देत या ठिकाणी परिवर्तन गाव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुसंख्य मतांनी प्रभाव करत या ठिकाणी दोन बिनविरोध व सात जागा निवडून आल्या आहेत त्यामुळे खांब ग्राम पंचायत ही पुन्हा राष्ट्रवादीकडे ठेवण्यात येथील स्थानिक कार्यकर्ते महिला मंडळ व युवक वर्ग यशस्वी ठरला आहे.

यशस्वी ग्राम पंचायतीची यशस्वी परंपरा राखण्यात राष्ट्रवादी ला यश आले आहे यामध्ये एकूण जागा नऊ प्रभाग क्रमांक १ योगेश यशवंत धामणसे,मानसी महेश चितळकर, रंजना योगेश टवले प्रभाग क्रमांक २ कांचन केशव मोहिते,चंद्रकांत जाधव, मनोज भाई शिर्के ,प्रभाग क्रमांक ३ दत्तात्रेय वातेरे ,सुचित्रा निलेश परबलकर,सारिका पार्टे हे नऊ उमेदवार खांब ग्राम पंचायतीवर नव्याने निवडून आले असून त्यांच्या सर्वत्र अभिनंदन होत आहे तर सर्व उमेदवारांच्या वतीने मतदार बंधू बघिणींचे जाहीर आभार मानले जात आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.