Press "Enter" to skip to content

गोवे ग्रामपंचातीवर राष्ट्रवादी पक्षाचा दणदणीत विजय,९ पैकी ९ सदस्य राष्ट्रवादीचे

सिटी बेल लाइव्ह । गोवे कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत गोवे येथील मतमोजणी नंतर राष्ट्रवादी पक्षाचे २ पैकी २ सदस्य दणदणीत मतधिक्य मिळवून निवडून आले असून या ग्रामपंचायत अगोदरच ९ पैकी ७ सदस्य हे बिनविरोध निवडून येऊन या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच ९ पैकी ९ सदस्य निवडून येऊन या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी पक्षाने निर्वाद वर्चस्व सिद्ध केले आहे.

रोहा तालुक्यातील गोवे ग्राम पंचायत मध्ये रायगडचे खासदार सुनील तटकरे,पालकमंत्री कु अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सदरील ग्राम पंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते,नळ पाणी पुरवठा,मशान भूमी, विहिरी दुरुस्ती,समाज मंदिर,गोवे, मुठावली शिरवली या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम व रस्ते व इतर विविध प्रकारची कामे केलेली असून उर्वरित असणारी कामे पुर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच सदस्य यांना दणदणीत मतधिक्याने निवडून आणुन सर्वांगिक गावचा विकास करण्यासाठी संधी दिली आहे.

या अगोदर गोवे ग्रामपंचायत मधील प्रभाग क्रमांक १ मधील नितीन तानाजी जाधव,सुप्रिया संदीप जाधव, निशा नितीन जवके,प्रभाग क्रमांक २ मधील रंजिता राजेंद्र जाधव, तर प्रभाग क्रमांक ३ मधील महेंद्र नामदेव पोटफोडे,यांच्या विरुद्ध अर्ज न दाखल झाल्यामुळे या ग्रामपंचायतीचे ५ सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत तसेच सोमवार दि.४ जानेवारी २०२१ रोजी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक २ मधील अंजेली लहू पिंपळकर व प्रभाग क्रमांक ३ मधील भावना भरत कापसे यांच्या विरुद्ध दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात आल्यामुळे ९ पैकी ७ सदस्य बिनविरोध निवडुन आले होते व उर्वरित दोन जागेसाठी निवडणूक घेण्यात आली या मध्ये प्रभाग क्र.२ मधून नरेंद्र हरिभाऊ पवार तर प्रभाग क्र.३ मधून सुमित गायकवाड हे प्रचंड मोठे मतधिक्य मिळवून निवडून आले आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे महेंद्र पोटफोडे,रामशेठ कापसे,प्रविण पवार, नरेंद्र जाधव,संदीप जाधव,विलास पवार,राजेंद्र जाधव,रामचंद्र पवार,राजेश शिर्के,भाई पोटफोडे,नथु शिंदे,रमेश पोटफोडे,भरत कापसे,तानाजी मोरे, बी.एस.भोसले,मधुकर कापसे,नाना कापसे,तुकाराम कापसे,लहू पिंपळकर,संदेश कापसे,रमण कापसे,विजय पवार,किशोर कापसे,गोविंद गायकवाड,रमेश गायकवाड, लीलाधर दहिंबेकर,भरत जाधव,किरण पवार, पाडुरंग जाधव, नितीन जवके,गोवे, मूठवली, शिरवली गावातील सर्व ग्रामस्थ,तरुण वर्ग यांनी सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.