सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
म्हाडा कॉलनी मधील रहिवासी रामराम पाटील यांचे निवासस्थान ते बीएसएनएल कार्यालयाच्या मागील बाजूस नगरपरिषद फंडातून सुमारे 16 लाख रुपये खर्च करून गटाराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले, या गटाराच्या कामाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नामफलकाचे अनावरण करून लोकार्पण सोहळा संपन्न झाला, याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका स्वामिनी मांजरे, संचिता पाटील, पुष्पा दगडे, वैशाली मोरे, सुवर्णा निलधे, विशाखा जिनगरे, नगरसेवक नितिन सावंत, राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, माजी नगरसेवक संतोष पाटील, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, ऋषिता शिंदे तसेच स्थानिक नागरिक दिनेश रावळ, हमीद खैराट,प्रशांत पाटील, संदीप भोईर, अरुण निघोजकर, गौरव भानुसगरे उपस्थित होते.
गटाराचे काम पूर्ण झाले, नागरिकांना होणारा त्रास संपला त्याबद्दल नगरपरिषदेचे स्थानिक नागरिकांनी आभार मानले.








Be First to Comment