Press "Enter" to skip to content

बोरघाट वाहतुक पोलीसांकडून रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

मुंबई पूणे द्रूतगती मार्गावर होणारे अपघाताला काहि प्रमाणात आळा बसविण्यास मागील वर्षात बोरघाट वाहतुक पोलीसाना यश आल्या नंतर येत्या वर्षात सुद्धा वाहतुक यंञणा सज्ज झाली असून बोरघाट महामार्ग पोलीस केंद्रात  रस्ता सुरक्षा 32 व्या अभियानाला सोमवार पासून  सुरुवात करण्यात आली.

  हे अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा अभियान उद्धघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर,सहायक पोलिस निरीक्षक जगदिश परदेशी, पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर , रामदास शेंडे, मनसे माजी रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवले, नगरसेवक किशोर पानसरे, अपघात ग्रस्त टीमचे  गुरुनाथ साठीलकर, रासप माजी जिल्हाध्यक्ष बबन शेडगे,सहज सेवा संस्थेचे  डॉ शेखर जांभळे, पोलीस हवालदार प्रशांत बोंबे,दोरे, पाटील, वर्तक, कोंडे, जाधव, ठाकूर, मोहिते, मेटकरी, पिसपुलवार, वेळे, मोरे, मात्रे,लाबोटे,शेळके, गावंड, शिंदे, लाड, कोळंबे, ठाकूर झ चव्हाण, थले,भवरी, हानीम करंजीकर,  आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते

या अभियानात एक्सप्रेस वे वर वारंवार होणारे अपघात कमी कसे होतील याचे महत्त्व वाहन चालकांना पटवून देणे, वाहन चालकांकडून होणारी लेन कटींग, वाहनाची वेग मर्यादा यावर नियंत्रण ठेवून अपघात रोखण्यासाठी उपाय योजना आणि नियमांचे पालन या संबंधाने मार्गदर्शन करून प्रबोधन करणार आहोत.

जगदीश परदेशीसहायक पोलीस निरीक्षक- बोरघाट पोलीस केंद्र

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.