Press "Enter" to skip to content

ज्युनियर नॅशनल इक्वेस्ट्रियन चँपियनशिपमध्ये माथेरान चा ओंकार चमकला

सिटी बेल लाइव्ह । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

ज्युनियर नॅशनल इक्वेस्ट्रियन चँपियनशिप स्पर्धा भारतीय क्रीडा समितीने दिल्ली येथे आयोजित केली होती.

यूनाइटेड रायडर्स बार्नच्या (यूआरबी) ओमकार दिनेश आखाडेने यंग रायडर्स प्रकारात शो जम्पिंग नॉर्मल इव्हेंटमध्ये तिसरा आणि टेक योर लाइन इव्हेंटमध्ये दुसरा क्रमांक मिळविला आहे.

एकूण 44 राईड्सने नॉर्मल शो जम्पिंग प्रकारात भाग घेतला होता अतिशय अटीतटीच्या ह्या रेस मध्ये अगदी थोड्या गुणांनी ओंकारला प्रथम क्रमाकांस मुकावे लागले होते त्याने तिसरा क्रमांक पटकवताना जुरींची वाहवा मिळवली
ह्याचवेळी झालेल्या टेक युअर लाईन इव्हेंट मध्ये 33 स्पर्धक रायडर्स मध्ये २ स्थान मिळविले

ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते हा प्रकार खर्चिक असल्याने ह्यामध्ये माथेरान सारख्या छोट्या शहरातून आलेल्या स्पर्धकाने विजय मिळविल्याने त्याचे सर्वच थरातून कौतुक होत असून देशातील कानाकोपऱ्यातून आलेल्या स्पर्धकांना मागे टाकत ओंकारने मिळविलेला हा विजय समस्त माथेरांकरांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.