Press "Enter" to skip to content

आंबोली ग्रामपंचायत निवडणूक : श्री बापदेव विकास परिवर्तन पॅनलचे घवघवीत यश !

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान ।

केवळ गावाच्या विकासासाठी आणि एका नव्या उगमाकडे नेण्यासाठी स्वप्नवत मार्गक्रमण करतांना आंबोली ग्रामपंचायत मध्ये सत्तेचा भाग नसताना देखील गावाला विकासाच्या प्रवाहात नेण्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात झपाटून कामे करत राजकीय क्षेत्रातील नव्याने पाऊल ठेवणाऱ्या शरद सखाराम शिंदे या उमद्या युवकाने आपल्या मित्रमंडळींबरोबर,जेष्ठांबरोबर निवडणुकीला सामोरे जाताना प्रस्थापित असलेल्या बापदेव ग्रामविकास पॅनलला अक्षरशः शरणागती पत्करायला लावून आपल्या श्री बापदेव विकास परिवर्तन पॅनलला भरघोस मतांची विजयश्री मिळवून देण्यासाठी गावातील तरुण कार्यकर्ते मच्छिंद्र लोहोट,माजी सरपंच लक्ष्मण शिंदे,कैलास शिंदे,दत्तात्रय शिंदे,श्रीपती सुतार,निलेश शिंदे,शाम शिंदे निखील शिंदे,सुरेश शिंदे, कुंडलिक काळडोके,महादेव खुटवड, कचराबाई, छायाताई,कांताबाई,,प्रभाकर काळडोके, हरी शिंदे,जयसिंग शिंदे,रघु शिंदे,स्वप्नील शिंदे,हरी शिंदे,सुदाम शिंदे,चंदु पाटील शिंदे,अशोक कोकणे दिनकर शिंदे, रोहीदास शिंदे,अरुण शिंदे,अतुल शिंदे, धनंजय शिंदे,अरविंद,दत्तात्रय काळडोके, संजय लोहोट,अशोक शिंदे,सुरेश शिंदे फणसेवाडी,निवृत्ती शिंदे ,रामदास केदारी,शंकर शिंदे,सुदाम शिंदे यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

शरद सारख्या तरुणांचा राजकीय झंझावात आणि सुरू असलेला प्रस्थापितांविरुद्धचा लढा केवळ ग्रामस्थाच्या सहकार्याने यशस्वी झाला आहे.बापदेव विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर याच पॅनेलच्या पुष्पाताई शिंदे यांच्या वार्डात अक्षरशः प्रतिष्ठेची लढत झाली त्यांच्या विरोधात अनेक दिग्गज मंडळींनी रणशिंग फुंकले होते त्यामुळे या अत्यंत चुरशीच्या लढतीत त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
ही निवडणूक खूपच चुरशीची आणि प्रतिष्ठेचा विषय बनल्यामुळे शरद शिंदे यांचे माथेरान मधील मोठे बंधू नगरपरिषदेच्या राजकीय क्षेत्रातील अभ्यासू नगरसेवक, विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे यांनी यावेळी आपला अमूल्य वेळ सखोल अभ्याससह आपले मित्र मंडळी भावकी व नात्या गोत्यात जाऊन प्रचार केला होताआणि तीन दिवस शिवाजी शिंदे हे सुध्दा या प्रतिष्ठेच्या निवडणुकी साठी तळ ठोकून राहिले होते.

गावातील सुज्ञ मतदारांच्या सहकार्याने जे परिवर्तन घडवून आणले आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहे.या परिवर्तनाच्या लढाईत गावातील भावकी,नातेवाईक,पॅनल प्रमुख,सुदामजी शिंदे,बाळासाहेब शिंदे,गावातील महिला,तरुणांची फळी यांच्या प्रचंड पाठींब्याच्या बळावर हे शक्य झालेय हे सगळे यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे आहे.या पॅनल साठी काम करणा-या सर्व मंडळींचे अभिनंदन.नकुशाताई,विष्णु,व दत्ता यांचा विजयाने गावात नवचैतन्य पसरलेय. खरे विजयाचे शिल्पकार आपण आहात.येणार्या काळात सगळयांना बरोबर घेऊन, जेष्ठांचा मार्गदर्शनाखाली गाव विकासाचा शिखरावर व सगळयांचा समतोल विकास घडवुन आणण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचित विजयी उमेदवार शरद शिंदे यांनी सांगितले आहे.

शरदचे शालेय शिक्षण माथेरान मध्ये झाले माथेरानच्या मातीत रूळलेला क्रिकेटच मैदान गाजवणा-या शरदने ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून राजकारणात दमदार एट्री केली आहे तो माझ्या दिशा क्लासेसचा विदयार्थी होता आमच्या सर्वाकडून त्याच मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.

योगेश जाधव–दिशा क्लासेस माथेरान,सचिव माथेरान नागरी सहकारी पतसंस्था, अध्यक्ष वनसंरक्षक समिती माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.