Press "Enter" to skip to content

नेरे शांतीवन वृद्धाश्रमातील तिळगुळ वाटप कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

कुष्ठरोग निवारण समिति संचलित रामकृष्ण निकेतन वृद्धाश्रम शांतिवन नेरे येथे शांतिवनात ” जे का रंजले गंजले तोचि म्हने” आपले खरा आनंद हा दुसऱ्याला देण्यात असतो. दुसर्याच हिरावून घेण्यात नसतो जगात अशी लोक असतत की जगातील गोर गरीब दिन दुबळे आणि या विषयी फक्त सहानुभूती नाही तर प्रत्यक्षात त्यांच्यात जवळ राहून त्यांना आनंद दिला तर खरच स्वर्ग प्राप्तीचा आनंद मिळाला होय !

या जगात फक्त तुमच्या कडे पैसे असतील तर आनंद मिळतो असे नाही परन्तु तुम्ही आनंद शोधला तर प्रत्येक गोष्टीत आनंद आहे निःशब्द होते मन जेव्हा एखादी एस एस सी बॉच आपल्याला मिळालेल्या सुट्टीचा वेळ हा जर त्या वृद्धाश्रमातील लोकांचे मनोरंजन आणि वृद्धाश्रमातील लोकांना तिळगुळ वाटप करण्यात साठी खर्च करत असेल तर अवर्णनीय आहे.

पिरकोन माध्यमिक विद्यालयातिल एस्. एस्. सी. १९८९ बॅचचे विद्यार्थी गेली ४ वर्ष सातत्याने संपुर्ण दिवसभर हा गोड कार्यक्रम करण्यात मग्न असतात. जो करील मनोरंजण इतरणांचे तो पोहचेल ईश्वराच्या पर्यन्त खरच या जगात अनेक लोक आहेत. परंतु इतरांच्या उपयोगी येणारे लोक हे मात्र कमी आहेत त्या पैकी ही एस एस सी बॅच होय.

सदर कार्यक्रम भावगीत भक्तिमय गीते असा भावपूर्ण मनोरंजन पर गीतांचा कार्यक्रम बॅचचे सदस्य देवेंद्र पाटिल, राजू ठाकूर आणि पूर्वनिर्धारित आयोजित ऑर्केस्ट्रा सादर केला यात वृद्धाश्रमातील लोकांचे पाय थिरकतील असा तालाचा ठेका पकड़ला तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात सदर प्रसंगी या प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती.
रामकृष्ण निकेततचे अध्यक्ष — विनायक शिंदे, सचिव — नंदकिशोर उरणकर
सेविका — सुनिता थळे
स्नेह कुंज वृध्दाश्रम नेरे
अध्यक्ष — नितीन जोशी.
गायक — विकी उपाध्याय, मुकेश उपाध्याय,नंदा भामरे, देवेंद्र, राजू ठाकूर.
दिव्या दिप फाउंडेशनचे अध्यक्ष– प्रदिप म्हात्रे.सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन — संदिप कोळी यांनी केले व कार्यक्रमाचे आयोजन — दहावी वर्ग १९८९ यांच्या तर्फे करण्यात आले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.