Press "Enter" to skip to content

रुपाली म्हात्रे यांनी ठेवला वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श सर्वासमोर

सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधि पुनाडे ।

जगात दुःख आहे परतू त्या दुःखाची जाणीव आपणास व्हायला हवी आणि ते दुःख स्वतःचे आहे असे समजून जगणारा माणूस हा अत्यंत संवेदनशिल होय ! जो पर्यंत दुसऱ्या विषयी आपल्या मनात आदर निर्माण होत नाही तो पर्यंत आपलं मनपरिवर्तन होत नाही.

वाढदिवस आणि त्याच आयोजन हे मोठे कार्यक्रम , पार्टी , किंवा अंदाधुंद दारू पार्टी यांच सेवन करून वाढदिवस हा साजरा केला जातो परंतु या सर्व गोष्टींचा त्याग करून आपण ज्या समाजात राहतो त्याचे अनेक उपकार हे आपल्यावर असतात आणि या जाणीवे पोटी नवीन वर्षाची दिनदर्शिका आणि जिवनावश्यक कपडे हे अदीवाशी बांधव जे बांधव खरेदी करू शकत नाही अश्या पर्यन्त पोहचविणे हे परमेश्वराच्या अगदी जवळ जाणारे कार्य होय हाच एक आदर्श सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर यांच्या सौभाग्यवती श्रीमती रुपाली ताई म्हात्रे यांनी नवीन वर्षाच्या दिनदर्शिका व उपयुक्त असे कपडे वाटप करून अनोखा आदर्श निर्माण केला.

कार्यक्रम प्रसंगी सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर , सुयश क्लासेस आवरे चे अध्यक्ष श्री निवास गावंड सर , सौ रुपाली म्हात्रे , रोहित जी पाटिल , धनेशा पाटील , रिया म्हात्रे , पुनाडे आदिवसी वरीला बांधव बुवा है प्रमुख मान्यवर उपस्थित होते अश्या प्रकारे आदिवासी बांधव यांच्यात वाढदिवस साजरा केला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.