Press "Enter" to skip to content

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’

सिटी बेल लाइव्ह । पनवेल ।

पनवेल तालुक्यातील सु. ए. सो. पालीचे, ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, माध्यमिक विद्यालय शिरढोण, या विद्यालयातील सहशिक्षक श्री प्रभाकर पांडुरंग मोकल यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा “२०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार” डी. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, स्टेशन रोड, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, सन्मानपत्र, व स्मृतिचिन्ह देवून सन्मानपर्वक गौरविण्यात आले आहे.

शिक्षण राष्ट्राचा सर्वागिण विकासाचा पाया आहे. त्यामुळे समर्पित वृत्तीने शैक्षणिक, सांस्कृतिक, कीडा, सामाजिक, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असते. श्री मोकल पी पी (सहा. शिक्षक) हे गेली २६ वर्षे सतत सेवेत कार्यरत असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण गुणवत्ता वाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न व विविध प्रकारचे शालेय – सहशालेय उपक्रम राबविल्यामुळे त्यांना २०२० च्या राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले आहे.

या प्रसंगी शिक्षण उपसंचालक मा. औदुंबर उकिरडेसाहेब, जेष्ठ विचारवंत मा. आवण देवरेसाहेब, मा.संदिप फणसे साहेब -(संस्थापक अध्यक, राष्ट्रीय रोष्टर चळवळ, भारत), संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा. संतोष गायकवाड, प्रदेश सचिव मा. सत्यजीत जानराव आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार सोहळा संपन्न झाला. श्री. मोकल पी पी (सहाशिक्षक यांना २.०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने आपल्या कार्याची पोचपावती मिळाल्याने समाधान व्यक्त केला आहे. परंतु त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाची आणखी जबाबदारी वाडल्पाचे मत व्यक्त केले आहे.

श्री. मोकल पी. पी. (सहा.शिक्षक) यांना मिळालेल्या या पुस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. वसंत ओसवाल साहेब, सचिव मा. रवि घोसाळकर साहेब व इतर पदाधिकारी, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सोनावणे मैडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, स्थानिक शालेय कमिटी अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, तसेच पंचक्रोशितील अनेक मान्यवर व माजी विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.