सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।
उरण तालुक्यातील जासई येथील १९८४ सालच्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांनाआज सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर १६ जानेवारी २०२१ हुतात्म्यांना एनसीसी कॅडेट च्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना रद्द करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्काकरिता १९८४ साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढयात १६ जानेवारी १९८४ रोजी चिर्ले येेथील नामदे्व शंकर घरत, धुतूम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले. तर दुसऱ्या दिवशी पागोटे गावातील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल हुतात्मा झाले. दरवर्षी या लढयात हुतात्मा झालेल्यांना अभिवादन करण्यात येते. मात्र यंदा कोविड १९ वैश्विक महामारीचा विचार करून कॅडेट मानवंदना रद्द झाली आहे.
मानवंदना रद्द झाली असली तरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार विवेक पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत, सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, जेएनपीटी ट्रस्टी दिनेश पाटील, अरुणशेठ भगत, नरेश घरत, रवी भोईर, किरीट पाटील, सरपंच संतोष घरत, संजय ठाकूर, मेघनाथ म्हात्रे, अविशेठ पाटील, शिक्षकवर्ग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.














Be First to Comment