डिझेल चोरी प्रकरणी 4 आरोपी गजाआड ; 20 लाखांचा माल केला हस्तगत
सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।
पनवेल परिसरात जबरी चोरी करून रोख रक्कम व डिझेल चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले असून जवळपास 20,19,900/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल परिसरात काही दिवसापासून डिझेल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या प्रकरणी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पो.आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि गुन्हे संजय जोशी यांच्यासह गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सपोनि देवळे ,पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, पोहवा वाघमारे , पोना परेश म्हात्रे , पोशि सुनिल गर्दनमारे , पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत ,पोशी विवेक पारासूर ,पोशी राजू खेडकर , पोना विनोद पाटील , गणेश चौधरी , पोना पंकज पवार ,पोशी साळुंखे, आदींनी ठिकठिकाणी सापळे रचून आरोपी हमद अब्दुल रहीम सय्यद, 26 वर्ष, रा.सेक्टर नंबर 10,डी. मार्ट चे बाजूला, कोपरखेरने,नवी मुंबइ, साहिल गोपाळ चव्हाण, वय 20 वर्ष, रा.सेक्टर नंबर 09, गार्डन जवळील चाळ, कोपरखेरणे, नवी मुंबई, निजामुद्दीन इकबाल खान,वय 19 वर्षे, रा. सेक्टर नंबर 10,डी. मार्ट समोर, कोपरखेरने, नवी मुंबई, अश्विन अनिल सिंग, वय 23 वर्षे, रा. कोपरखेरणे गाव, नवी मुंबई ( चोरीचे डिझेल घेणारा ) अशा 4 आरोपींनाअटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे.








Be First to Comment