Press "Enter" to skip to content

भारत विकास परिषदे द्वारे बालिका सप्ताहाचे आयोजन

श्रीनिवास काजरेकर
पनवेल दि. १५

राष्ट्रीय ‘कन्या दिना’ निमित्त १७ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीमधे भारत विकास परिषदेतर्फे महिला व बाल विकास आयामा अंतर्गत ‘बालिका सप्ताहा चे आयोजन करण्यात येत आहे. या आठवड्यात भारत विकास परिषदेच्या सर्व शाखा, देशभरात सर्वत्र एकाच पद्धतीचे कार्यक्रम घेणार आहेत. बेटी है तो सृष्टि है या संकल्पनेवर आधारित सर्व कार्यक्रम आहेत.
पनवेल शाखेतर्फे हा उपक्रम खोपोली नजीक देवशेतवाडी येथे राबविला जाणार आहे. १० ते १८ वयोगटातील मुलींची हिमोग्लोबीन चाचणी, अशक्त मुलीना मोफत लोहयुक्त आहारवाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, कपडे व गणवेष वाटप, ‘मासिक पाळी व स्वच्छता’ तसेच लैंगिकता या विषयावर डॉ. शिल्पा परहर यांचे व्याख्यान, स्थानिक महिलांचे भजन, सामुदायिक हरिपाठ आदी विविध प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ‘संस्कारीत बेटीयाँ, महकता आँगन’, ‘राष्ट्रके उत्थान में बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ आणि ‘शिक्षित कन्या है वरदान’ या विषयांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम येथील मुली व महिला सादर करणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना पनवेल शाखेच्या महिला संयोजिका ज्योती कानिटकर यांनी सांगितले, संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण या पंचसूत्री नुसार सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सध्या
ऍनिमिया-मुक्त भारत’, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या दोन अभियाना अंतर्गत मुलींच्या शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातही मोलाचे कार्य सुरू आहे. आता होणाऱ्या बालिका सप्ताहाला पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल उपस्थित राहणार असल्याची माहिती ज्योती कानिटकर यानी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.