सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । प्रतिनिधी ।
कोकणातील ज्येष्ठ पत्रकार शैलेश वसंत पालकर यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई(रजि.)च्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सक्रीय कार्यकारिणी मंडळ सदस्य असलेल्या शैलेश पालकर यांच्या नियुक्तीबद्दल कोकणात सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई(रजि.)च्या कार्यकारिणी बैठकीमध्ये राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सुचनेनुसार प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी पोलादपूर येथील पत्रकार शैलेश पालकर यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती निश्चित केली असल्याचे नियुक्तीपत्रामध्ये प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी नमूद केले आहे.
कोकणासह राज्यातील पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आणि जनआंदोलने याबाबत सर्वाधिक जनसंपर्क असलेले ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांच्यासह रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी खेड येथील चंद्रकांत बनकर आणि सिंधूदूर्ग जिल्हाध्यक्षपदी आबा खवणेकर यांचीही नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे.
वेब मिडीया, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या प्रतिनिधींना या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई(रजि.) संघटनेत सभासद होता येणार असून 20 फेब्रुवारी 2021 रोजी ठाणे येथे गडकरी रंगायतनमध्ये राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी राज्यातील पत्रकारांच्या समस्यांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांना अवगत करण्यात येणार असल्याने या संघटनेमध्ये रायगड जिल्ह्यासह कोकणातील पत्रकारांनी सभासदत्व स्विकारण्याचे आवाहन यावेळी नवनियुक्त रायगड जिल्हाध्यक्ष शैलेश पालकर (मोबाईल क्रमांक- 9226849185) यांनी केले आहे.








Be First to Comment