Press "Enter" to skip to content

सिध्देश्वरी काॕर्नरजवल अंडरग्राऊंड गटारात उतरून काम करणाऱ्याचा मृत्यू

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी काॕर्नंर येथे रस्त्याच्या खाली असलेल्या अंडर ग्राऊंड गटारात पाण्याचे पाईप टाकण्यास गेलेल्या जगन पांडुरंग पवार (वय ३०)याचा मृत्यू झाल्याची घटना रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चावंढोळी गावाच्या हद्दीत सिध्देश्वरी काॕर्नंर येथे रस्त्याचे खाली असलेल्या अंडर ग्राऊंड गटारात पाण्याचे पाईप टाकण्यासाठी कोणतेही सुरक्षेची साधन व गटाराची खोली रुंदी माहिती न घेता तसेच ते काम करण्यास कोणत्याही विहीत संस्थेची लेखी परवानगी न घेता गटारात उतरण्यास व काम करण्यास सांगितले .

अंडर ग्राऊंड गटारात काम करीत असताना जगन पांडुरंग पवार यांचे गुदमरून व पाण्यात पडून मयत झाल्याने आरोपी धिरज गणपत पाटील (वय२२),ज्ञानेश्वर सोपान गायकवाड (वय ४३), प्रकाश रघुनाथ खंडा (वय३४) यांच्यावर रसायनी पोलीस ठाण्यात निष्कालजीपणामुले मृत्यू झाल्याबाबत गुन्हा रजिस्टर न.२/२०२१ भा.द.वि.स. कलम ३०४ (अ ) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मुल्ला करत आहेत.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान गुरुवारी दुपारच्या सुमारास तहसिलदार इरेश चप्पलवार,मंडल अधिकारी नितीन परदेशी,तलाटी कोतवाल गायकवाड व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी मयत जगन पांडुरंग पवार यांच्या कैरे येथील निवासस्थानी भेट घेतली.व सदर मयताच्या कुटूंबाला घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.