Press "Enter" to skip to content

दुकानात घरफोडी करणार्‍याला तळोजा पोलिसांनी केले गजाआड

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

तळोजा परिसरात दुकानात घरफोडी करणार्‍या दोघा जणांना तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गजाआड केले असून त्यांच्याकडून घरफोडीचा ऐवज हस्तगत केला आहे.

जाफर अब्दुल जब्बार खान (24) व अमीर उर्फ अम्मू अय्युब खान (33) अशी या दोघांची नावे असून त्यांनी खुटारी गाव येथील एका दुकानाचे कुलूप तोडून घरफोडी केली होती. या संदर्भात पोलीस काशिनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक अधिक तपास करीत असताना या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी आत्तापर्यंत दोन घरफोडीचे गुन्हे कबुल केले आहेत. त्यांच्याकडून घरफोडीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.