कानसा वारणा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर : विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटप
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
यशवंत महादेव कांबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कानसा वारणा फाउंडेशनचे संस्थापक दिपक पाटील यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिर व आदिवासी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कानसा वारणा फाउंडेशनचे ठाणे युवा अध्यक्ष नितीन कांबळे यांनी आपल्या पित्याचा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.यावेली ठाणे येथील ब्लडलाईंन ब्लड बँकचे डॉ मुकेश पाटील व त्यांची टिम उपस्थित होती.

यावेळी रक्तदात्यांना डॉक्टरांनी मार्गदर्शन करुन रक्ततपासणी करण्यात आली. यानंतर जवलपास ७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच आदीवासी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी आदीवासी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपकदादा पाटील (संस्थापक -कानसा वारणा फाउंडेशन व कार्याध्यक्ष शांतिदुत परिवार,बौध्दाचार्यं बि.आर.जाधव, गणराज जैन, संस्थापक-(पाणवठा अपंग प्राणी), डाॅ. अर्चना गणराज जैन, वैज्ञानिक अधिकारी डॉक्टर दीपक शिंदे( टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई) आम्रपाली शिंदे, सुनील दांडगे,अशोक जाधव,बिपीन सावंत, अक्षय कांबळे, राहुल म्हस्के,देवानंद भोसले. महेश कांबळे, आबा जाधव, निलेश कदम, प्रशांत जाधव, विष्णु पाटील, राजन सौदे, सुनील घाडे तसेच दत्ता लोहकरे आदी उपस्थित होते.








Be First to Comment