सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. कोव्हीड १९ च्या नियमांचे पालन करून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. सदर शिबिरात एकूण ३० रक्त दात्यांनी रक्तदान केले.

प्रा.मनोहर सिरसाठ, मोहन म्हात्रे, विक्रम काटकर यांनी दरवर्षी प्रमाणे रक्तदान करून तरूणांना प्रेरणा देण्याचे चांगले काम केले. सौरभ भोईर व तुषार पाटील व प्रसाद मरवडे यांनी मुलांना संपर्कात ठेवण्याचे काम केले. कोव्हीड १९ च्या काळात महाविद्यालय नियमित चालू नसतांना विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदेश गुरव यांनी सांगितले.
हे शिबीर प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ श्रीकृष्ण तुपारे यांनी यशस्वीपणे राबविले. कार्यक्रम अधिकारी डॉ. पी एन ज्योथी, प्रा. विकास शिंदे, डॉ. विलास जाधवर, प्रा मनोहर सिरसाठ, मा. किशोर घरत, दिपक दाभाडे, सौरभ भोईर, तुषार पाटील, प्रसाद मरवडे, रूतुजा दळवी, उत्तम बावदाने, नितेश आदींसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.








Be First to Comment