Press "Enter" to skip to content

सरपंच संतोषभाई कोळी यांचा पुढाकार

पिंगोडे ग्रामपंचायती तर्फे अपंगांना निधी वाटप

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्याजवळील पिंगोडे ग्रामपंचायतीचे सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोषभाई कोळी हे जनसामान्यांच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. त्याचाच एक भाग म्हणून सरपंच संतोषभाई कोळी यांनी ग्रामपंचायतीच्या ५ टक्के अपंग कल्याण निधीतुन ३४ लाभार्थींना ४ लाख ४८ हजार ८०० रुपये वाटप करून आपले कर्तव्य निभावले.

पिंगोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच स्वर्गवासी जनार्दन कोळी यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा लाडका लहान चिरंजीव संतोषभाई कोळी काम करीत असल्याचे पाहून जेष्ठ ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत. दरम्यान नागोठणे विभागातील अपंग बांधवांनी जेष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, अनुपमा सिन्हा व नागोठणेचे सुपुत्र आंतराष्ट्रीय खेडाळु संदिप गुरव यांचा आदर्श घेतला पाहिजे असे यावेळी संतपंच संतोषभाई कोळी यांनी अपंग बांधवांना सूचना केल्या तसेच तुमच्या काही अडीअडचणी असल्या तर मला सांगा मी त्या अडचणी वयक्तित पातळीवर सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील यावेळी सरपंच संतोषभाई कोळी यांनी दिली.

पिंगोडे ग्रामपंचायतच्या वतीने बुधवार दि. १४ जानेवारी रोजी असलेला अपंग दिनाचे औचित्य साधून सरपंच संतोषभाई कोळी यांनी आपल्या पंचायत हद्दीतील अपंग बांधवांना पंचायत शासन मध्ये जो निधी उपलब्ध असतो त्याचा प्रामाणिकपणे वापर करून प्रत्येक अपंग बांधवाना १३ हजार २०० रुपये वाटप करून अपंग बांधवांचे आशीर्वाद घेतले.

पिंगोडे ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या ह्या जनकल्याण कार्यक्रमास सरपंच संतोषभाई कोळी यांच्या समवेत उपसरपंच सखाराम घासे, जेष्ठ सद्स्य नाना बडे, नेत्रा रोशन पारंगे, कांचन माळी, रंजना माळी, धनाजी पारंगे, शैलेश शेलार, गीता पाटील, कुसुम बावकर, जेष्ठ नेते माजी सरपंच काळुराम माळी, मनोहर माळी, माजी तंटामुक्त अध्यक्ष गोरखनाथ पारंगे, अंकुश ताडकर, ग्रामसेवक विजय अहिरे, कारकून विजय मांडुलस्कर व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान उपसरपंच सखाराम घासे यांनी उपस्थितांचे स्वागत तसेच आभार प्रदर्शन शैलेश शेलार यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.