Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायत निवडणूक पाश्र्वभूमीवर रसायनी पोलिसांचा रुट मार्च

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आपटा, जुनी पोसरी व सावले या ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत पार पडाव्यात या अनुषंगाने रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे , खोपोली पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक क्षिरसागर, खालापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली ४७ कर्मंचारी आणि होमगार्ड यांचा रुट मार्चं काढण्यात आला.

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आपटा, जुनी पोसरी,सावले या ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही आणि निवडणूक शांततेत पार पडाव्यात, याबाबत नागरिकांना सुचना देण्यात आली.तसेच तीन पोलिस अधिकारी व ४७ पोलिस कर्मचारी होमगार्ड असे सोबत घेऊन आपटा, जुनी पोसरी,सावले गावात रुटमार्चं काढण्यात आला.तसेच आगामी येणाऱ्या निवडणुक संदर्भात गावाचा आढावा घेण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुक शांततेत पार पडाव्यात यासाठी रसायनी पोलिस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुल्ला अधिक परिश्रम घेत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.