Press "Enter" to skip to content

भारतीय बौद्ध महासभेच्या तालुका कार्यकारिणीचे काम कौतुकास्पद : भिमराव आंबेडकर

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्यं श्रामणेर प्रशिक्षण शिबीर व समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबीर मोहोपाडा रसायनी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवनात कार्यंक्रमाचे अध्यक्ष राम जाधव यांच्या उपस्थितीत पार पडले.या दहा दिवशीय प्रशिक्षण शिबीराचा समारोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव साहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी मोहोपाडा रसायनी येथील भारतीय स्टेट बँकेच्यासमोर गेटवर भिमराव साहेबांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.यानंतर बॅन्डच्या तालावर पुष्प उधळण करीत स्वागत करण्यात आले.डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या प्रवेशद्वारासमोर भन्ते शिवली बोधींनीही भिमराव साहेबांचे स्वागत केले.यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे पनवेल तालुका कार्यकारिणीच्यावतीने आयोजित प्रशिक्षण शिबीराचे तालुकाध्यक्ष राम जाधव , सरचिटणीस राहुल कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश कलोते,संस्कार उपाध्यक्ष सुनिल कांबळे व इतर पदाधिका-यांच्याहस्ते राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर यांचा सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यानंतर जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा पदाधिकाऱ्यांनीही भिमराव साहेब आंबेडकर यांचा सन्मान केला.यावेली प्रशिक्षण शिबीरातील भन्ते शिवली बोधींचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहीले होते. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव आंबेडकर म्हणाले की,सन 2021 मध्ये मार्च अथवा एप्रिल महिन्यात राज्यात जनगणना होणार आहे.भिमा कोरेगावला अभिवादन करून सुरूवात करावी असे विचार माझ्या मनात असताना तेथे कोणालाही कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी नव्हती.परंतू भारतीय बौद्ध महासभ आणि समता सैनिक दलाचे संचलन कार्यक्रम पार पडला.

रसायनीतील हा माझा दुसरा कार्यक्रम आहे,हे शिबिर आयोजित करणा-या भारतीय बौद्ध महासभेच्या पनवेल तालुका कार्यकारिणीचे कार्य कौतुकास्पद आहे ,असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमरावसाहेब आंबेडकर यांनी बोलताना सांगितले.

यावेळी राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे,एम.डी.सरोदे गुरुजी,यु.जी.बोराडे महाराष्ट्र अध्यक्ष, विजय कांबले महाराष्ट्र कोषाध्यक्ष, सुशील वाघमारे महाराष्ट्र संस्कार उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्षा संपदाताई चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे पनवेल कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.