Press "Enter" to skip to content

डायोसिस ऑफ बिलीव्हर्स ईस्टर्न ट्रस्टच्यावतीने आदिवासींना धान्याचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

डायोसिस ऑफ बिलीव्हर्स ईस्टर्न ट्रस्टच्यावतीने शिवाजीनगर आदिवासी वाडीत सत्तर रेशन किटचे वाटप करण्यात आले.

मानव सेवा ही परमेश्वराची सेवा आहे आणि आपण आदिवासी लोक आमच्याच कुटुंबातील आई,वडील,भाऊ यापैकी एक आहात.आमच्याकडे एखादी मदत आली तर आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम आमची ट्रस्ट करत असते.जे जे आमच्याकडे येईल ते आपल्या आदिवासी बांधवांना देण्याच काम आम्ही नक्कीच करू असे फादर बेनी इपेन यांनी बोलताना सांगितले. तर समाजात वावरताना गरिबीची झल पोचत असताना गरिबांना दान देण्याची गरज महत्वाची असते समाजात खूप दानशूर दान देणारे आहेत ,पण कोणी पुढे येत नाही.

आज कोरोनामूळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आहे .या ट्रस्टने रेशन कीटचे वाटप करुन गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. खरोखर गरिबीची जाण असनारी ही ट्रस्ट आहे असे माजी उपसभापती वसंत काठावले म्हणाले.

या कार्यक्रमासाठी फादर ड़ी.वर्मां आणि फादर जॉन हाइड,नगरसेवक बबन मुकादम माजी उपसरपंच अनिल काठावले, दीपक ठाकूर,सुनील पाटील, अरुण पाटील, सुभाष पाटील,नथुराम पाटील ,अनंत ठाकूर ,दीपक पाटील हे उपस्थीत होते.यावेली मान्यवरांच्या हस्ते 70 आदिवासी कुटुंबाना रेशनकिटचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.