सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सिबिएसईं अभ्यासक्रमाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात रसायनी चांभार्ली येथील कु.आर्यं मिलिंद भगत हा ९७.६ टक्के गुण मिळवून खालापूर तालुक्यातून पहिला आला आहे.कु.आर्य हा डॉक्टर दाम्पत्य रोटेरियन डॉ.मिलींद आणि डॉ.सौ.शीतल भगत यांचा मुलगा आहे.तो लोधिवली येथील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलमध्ये शिकत होता.त्याला अभ्यासात अधिक रस असल्याने त्याने सिबिएसईं बोर्डांच्या दहावीच्या परीक्षेत ९७.६ टक्के गुण मिळवून खालापूर तालुक्यातून पहिला येण्याचा मान मिळविला आहे.संपूर्ण वर्षभर नियमित अभ्यास व शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यातून हे यश त्याने संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व थरांतून अभिनंदन होत आहे.






Be First to Comment