Press "Enter" to skip to content

श्रमजीवी संघटनेची आदिवासी वाड्यांच्या समस्येबाबत खालापूर पंचायत समितीत बैठक

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

तालुक्यातील वडगाव आणि वावंढळ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांना भेडसावणा-या नागरि सुविधाबाबत खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी आणि श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी यांच्यात बैठक पार पडली.

वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव व तळवली मधील आदिवासीवाड्याना नागरि सुविधा आणि वाशिवली आदिवासी वाडीतील घराना काढलेल्या नोटीसीचा जाब विचारण्यासाठी  श्रमजीवी संघटनेनी आठ दिवसापूर्वी वडगाव ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला होता. वावंढळ ग्रामपंचायत हद्दीत देखील नागरिसुविधा बाबत ठिय्या आंदोलन करण्यात आल होत.त्यानंतर या प्रश्नावर चर्चेसाठी पंचायत समिती खालापूर येथे गटविकास अधिकारी  संजय भोये, श्रमजीवी संघटनेचे संजय गुरव,योगिता दुर्गे ,हिराताई पवार आणि पदाधिकारी यांच्यात सकारात्मक बैठक पार पडली. 

वावंढळ ग्रामपंचायत हद्दीतील  आदिवासी कुटूंबात पत्नीचे नाव देखील घरपट्टीवर लावणे,समाज मंदिर वाढीव निधी , रोजगार हमीतून रस्ता कामे मार्गी लावणे आदि निर्णय घेण्यात आले.तसेच वडगाव ग्रामपंचायतीचा 15 टक्के निधीतून तळवली व दांडवाडीसाठी पेयजल योजना,वाशिवली वाडीसाठी 40 लाख रस्त्याचा प्रस्ताव यावर चर्चा झाली.

 

वाशिवली गावातील गावठाणात असलेली आदिवासींची घरे उठविण्यासाठी  हालचाली सुरू असून तशा नोटीसी पाठविल्याने श्रमजीवी संघटना आदिवासी कुटूंबाच्या मागे ऊभी राहिली आहे.शासनाने जिल्हास्तरावर समिती नेमली असून प्रांताना अधिकार दिले आहेत.आदिवासी कुटूंबाच्या घराना हात लावल्यास श्रमजीवी संघटना गप्प बसणार नाही.

संजय गुरव – सचिव श्रमजीवी संघटना

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.