सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे #
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे.कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारही खूप मेहनत घेऊन काम करत आहे.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी लॉकडाऊन करून प्रयत्न सुरू आहेत.खालापुर तालुक्यातील वासांबे मोहोपाडा येथे रसायनी एम.आय.डी.सी. मध्ये कार्यरत असणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी या ठिकाणी राहत असल्यामुळे दिडशेपेक्षा जास्त रूग्ण कोरोनाबाधित झालेले आहेत. या परिसरामध्ये कोणतेही सरकारी किंवा खाजगी रुग्णालय कार्यरत नाहीत. यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना पनवेल अथवा नवी मुंबई याठिकाणी न्यावे लागत आहे. बऱ्याच वेळा बेड उपलब्ध नसल्यामुळे वासांबे मोहोपाडा हद्दीतील तिघा कोरोनाबाधितांना आपला रुग्णाला जिव गमवावा लागला आहे. वासांबे मोहोपाडा परीसरामध्ये केंद्र सरकारच्या सेबी(NISM) चा मोठा गृह संकुल रिकामे असून त्याठिकाणी लाईट, पाणी, कॅंटीनची योग्य व्यवस्था आहे. तसेच पिल्ले कॉलेज,रसायनी येथील जेन्ट्स व लेडीज हॉस्टेल रिकामा आहे.
तरी या दोन्ही ठिकाणी किमान १०० बेडचे कोव्हीड-19 चे तात्पुरत्या स्वरुपाचे रुग्णालय चालू करावे अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदीती तटकरे, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
दरम्यान वासांबे मोहोपाडा येथे शंभर बेडचे रुग्णालय झाल्यास येथील रुग्णांची योग्य सोय होईल. आपण या विषयाकडे तातडीने लक्ष केंद्रित करून येथील कोरोना व्हायरस बाधित झालेल्या रूग्णांसाठी रुग्णालयाची उपलब्धता करून द्यावी,अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली आहे.






Be First to Comment