Press "Enter" to skip to content

आणी 4 वर्षाच्या हरवलेल्या मुलाला पाहताच आईने फोडला हंबरडा

हरविलेल्या 4 वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून दिले पालकांच्या ताब्यात

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर ।

कामोठे वसाहत परिसरात हरविलेल्या चार वर्षीय मुलाला पोलिसांनी शोधून काढून तात्काळ मुंडेकर कुटुंबियांच्या ताब्यात दिल्यावर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.

कामोठे वसाहतीतील सेक्टर 12 गगनगिरी सोसायटी येथे राहणार्‍या मुंडेकर कुटुंबियांचा 4 वर्षीय मुलगा उदय हरविल्याने त्यांनी याबाबत तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात देताच वपोनि संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि सुरवाडे, पोलीस हवालदार होवाळ बीट मार्शल 3 वरील अमलदार पोलीस नाईक  म्हात्रे व पोलीस नाईक पवार व पोलीस नाईक भोई, महिला पोलीस अंमलदार भोर यांनी हरविलेला उदयचा शोध घेण्यास सुरूवात केली.

खास खबर्‍यांमार्फत तसेच इतर नागरिकांच्या सहकार्याने सदर हरविलेला मुलगा सेक्टर 21 प्लॉट नंबर 45, 46 कामोठे येथे असल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी पोलिसांचे पथक गेले व त्यांनी सदर मुलाला ताब्यात घेवून वपोनि संजय पाटील यांच्यासाक्षीने त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द केले.

यावेळी त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. अवघ्या 5 तासात उदयचा शोध घेतल्याबद्दल कामोठे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.