सिटी बेल लाइव्ह । उरण ।
राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती जासई मधील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात साजरी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनश्याम कडू, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे, शाळेचे प्राचार्य संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग, उपमुख्याध्यापक यु एम खाडे, वरीवेक्षक आर एस साळुंके,रयत सेवक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक नुरा शेख,शिक्षक डी बी म्हात्रे, जी आर म्हात्रे ,रुपेश पाटील,टी टी घरत मॅडम ,बी एल पाटील मॅडम आदी उपस्थित होते.








Be First to Comment