Press "Enter" to skip to content

राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद जयंती निमित्त कर्जत नगरपरिषदेचे अभिवादन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांची आज जयंती, कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. राजमाता जिजाऊसाहेब भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका स्वामिनी मांजरे, वैशाली मोरे, संचिता पाटील, सुवर्णा निलधे, पुष्पा दगडे, विशाखा जिनगरे, नगरसेवक नितीन सावंत तसेच नगरपरिषद कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, रविंद्र लाड, सारिका कुंभार, ऋषिता शिंदे, सुदाम म्हसे, सुनिल लाड, बापू बहिराम, विभावरी म्हामूणकर, बाळा निकाळजे, नागरिक मकरंद गोगटे, वकील शरद सावंत आदी उपस्थित होते. कल्याणी लोखंडे यांनी राजमाता जिजाऊसाहेब तर अविनाश पवार यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती दिली, सूत्रसंचालन रविंद्र लाड यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.