जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी केली गव्हाण आरोग्य केंद्राची पाहणी
सिटी बेल लाइव्ह । उलवे ।
प्राथमिक आरोग्यकेंद्र गव्हाण येथे रायगड जिल्हा परिषद सदस्य रविंद्र विश्वनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आरोग्य केंद्राची पाहणी करूण आरोग्य केंद्रासाठी लागणारे साहीत्य तसेच औषधे यांची मागणी जिल्हा परिषद व सिडको यांच्याकडे करण्यात आली.
याप्रसंगी साई संस्थान वहाळ चे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

रविंद्र पाटील यांच्या जिल्हा परिषद निधी मधुन पाच लाखांचा निधी गव्हाण आरोग्यकेंद्रासाठी देण्यात येणार आहे. तसेच गेल्या वर्षी नऊ लाखांचा जिल्हा परिषदेकडुन निधी मंजुर करुन जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी ओरोग्य केंद्राचे दुरुस्तीचे काम करून चांगल्या प्रकारे शुशोभिकरण करुन घेतले आहे. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.









Be First to Comment