सिटी बेल लाइव्ह । कर्जत । गणेश मते।
कर्जत आणि नेरळच्या मध्यवर्ती असलेल्या डिकसळ येथे आठवडा बाजार सुरू करावा, अशी मागणी स्थानिकांनी उमरोली ग्रामपंचायतीकडे केली आहे. याबाबतचे निवेदनही सादर करण्यात आले आहे.
खोपोली-कर्जत- कल्याण महामार्गावरील डिकसळ येथे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले उभी राहिली आहेत. तसेच, तासगावकर कॉलेज, रायगड हॉस्पिटल यांसह पावसाळी पर्यटनानिमित्त डिकसळ येथे कायम गर्दी असते. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आठवडा बाजार सुरू करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.
यामुळे तरुण, रहिवाशांना चांगला रोजगार मिळणार असून क्षुल्लक वस्तूंसाठी पायपीट टळू शकते. तसेच, ग्रामपंचायतीलाही महसूल मिळणार आहे. तसे निवेदन नुकतेच सामाजिक कार्यकर्ते किशोर गायकवाड, जीवक गायकवाड यांनी उमरोली ग्रामपंचायतीला दिले आहे.








Be First to Comment