सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
नागोठण्याजवळील पळस ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग क्र. दोन व प्रभाग क्र. तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ची शिवसेना भाजपा युतीशी थेट लढत होत आहे. तसेच प्रभाग क्रमांक एक मध्ये श्री अकादेवी विकास आघाडीची लढत शिवसेना भाजपा युतीशी होत असून या लढतीत बाजी कोण मारणार याची उत्सुकता नागोठणे विभागातील जनतेला लागली आहे.
पळस ग्रामपंचायतीवर गेले ३० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागातील नेते शिवरामभाऊ शिंदे यांचे वर्चस्व असून या निवडणुकीत पुन्हा ते आपले वर्चस्व सिद्ध करतात का? हे सोमवार दि. १८ जानेवारी रोजी समजणार असले तरी या निवडणुकीत देखील खा. सुनिल तटकरे, पालकमंत्री ना. अदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके व सदानंद गायकर यांच्या सहकार्याने पळस ग्रामपंचायती मध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता प्रस्थापित होणार असल्याचा आत्मविश्वास रा. कॉ. नेते शिवरामभाऊ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
पळस ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्र. एकचे (शेतपळस) श्री अकादेवी विकास आघाडीचे उमेदवार विक्रांत तुकाराम घासे, सुप्रिया वामन डाकी, परिक्षा विक्रांत घासे तसेच प्रभाग क्र. दोनचे (पळस ) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पप्पू गंगल वाघमारे, चंद्रकांत कृष्णा भालेकर, निष्ठा योगेश विचारे व प्रभाग क्र. तीनचे ( बाहेरशिव व वाघळी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर धोंडुराम म्हात्रे, सारिका प्रकाश कदम, शोभा गणेश जोशी आदी उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान पळस ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी शिवरामभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पळसचे माजी सरपंच हिराजीभाऊ शिंदे प्रचंड मेहनत घेत आहेत.








Be First to Comment