सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
रोहा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अनेक ग्रामपंचायतींमधीलच एक महत्वाची अशी समजली जाणाऱ्या वाशी ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्राचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे वाशी ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडी बाजी मारणारच अशी चर्चा सर्वत्र होताना दिसून येत आहे.
वाशी ग्रामपंचायती मधील महत्वाचे प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीचे सुरेश सोनू शिद हे अनुसूचित जाती जमाती या आरक्षित जागेसाठी, नागरीकांचा मागास प्रवर्ग या राखीव जागेसाठी तुकाराम नामदेव भगत तर अनुसूचित स्त्री या राखीव जागेसाठी विनिता चंद्रकांत शिद हे तीन उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत आहेत. या तिन्ही उमेदवारांना प्रचार करतांना मतदारांचा भरघोस पाठींबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.
याशिवाय वाशी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोन मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसाधारण जागेसाठी जगदीश शंकर भगत, नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव जागेसाठी कस्तुरी किरण शिर्के व सर्वसाधारण स्त्री जागेसाठी स्नेहल सचिन भगत हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असून या तिघांनाही मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.








Be First to Comment