Press "Enter" to skip to content

वणी बस थांब्यासाठी ३ लाखांचा निधी

वणी गावातील बसस्थानकाचा प्रश्न आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या सहकार्याने मार्गी लागणार

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।

नागोठण्याजवळील वणी (ता.रोहा) गावातील गेली अनेक वर्षे रखडलेला बसस्थानकाचा प्रश्न विधानपरिषदेचे कार्यतत्पर आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी स्वतःच्या आमदार निधीतून फंड उपलब्ध करून सोडविला आहे. त्याबाबतचे पत्र आ. अनिकेतभाई तटकरे यांनी नुकतेच वणी गावातील राष्ट्वादीचे युवा नेते व युवक राष्ट्वादी काँग्रेसचे रोहा तालुका उपाध्यक्ष दिपेंद्र आवाद व वणी गावातील ग्रामस्थ यांच्याकडे सुपूर्द केले.

यावेळी वणी गावातील अविनाश मांडलूस्कर, दिपक वनकर, सचिन नवघरे तसेच राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे विभागातील कार्यकर्ते प्रमोद जांबेकर व अमित जांबेकर हे देखील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.