Press "Enter" to skip to content

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या प्रयत्नाला यश


उरणमध्ये 7 आधार केंद्र असल्याचा प्रशासनाचा दावा

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

उरण तालुक्यात आधार केंद्राची अडचण दूर करण्याची मागणी पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या मागणीची दखल घेऊन उरणमध्ये 9 आधार केंद्रापैकी 7 आधार केंद्र सुरु असल्याचा दावा लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या पत्रात केला आहे. यामुळे उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या प्रयत्नाला यश आल्याने उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

आधारकार्ड हे प्रमुख ओळखपत्र मानले जात आहे. परंतु उरणमध्ये जेएनपीटी येथे आधारकार्ड केंद्र असल्याने तालुक्यातील जनतेची मोठी ससेहोलपट होते. ती थांबविण्यासाठी तालुक्यातील इतर ठिकाणी आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घनःश्याम कडू यांनी रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती. या पत्राची दखल घेऊन त्यांनी तालुक्यात माहिती व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत 3 आधार केंद्र सद्यस्थितीत कार्यरत असून दोन आधार केंद्र यु.आय.डी.एस.आय. यांच्या 2 स्टेप प्रोसेससाठी प्रलंबित आहेत. तसेच पोस्ट ऑफीसद्वारे 4 आधार केंद्र सद्यस्थितीत कार्यरत आहेत. अशाप्रकारे उरण तालुक्यात एकूण 9 आधार केंद्रापैकी सात आधार केंद्र सद्यस्थितीत कार्यान्वित असल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सहीचे पत्र उरण तालुका मराठी पत्रकार संघास दिले आहे. त्या सोबत तालुक्यात ज्या ठिकाणी आधारकेंद्र आहेत त्यांची नाव, गाव, पत्ता व ठिकाणे यांचीही यादी सोबत जोडली आहे.

या पत्रात जिल्ह्यामध्ये माहिती व तंत्रज्ञान विभाग यांच्याकडून एकूण 94 आधारकेंद्र सुरु आहेत. तरी जिल्ह्यासाठी आधार केंद्र अपुरे पडत असल्याने अतिरिक्त आधार केंद्र सुरु करण्यासाठी तसेच खासगी आधार केंद्र सुरु करण्याबाबत संचालक माहिती व तंत्रज्ञान विभाग यांचेकडून संदर्भ क्र. 2 अन्वये मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. त्यातील निर्देशाप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सुचित केले आहे. उरण तालुक्यात सुरु असलेल्या 7 आधार केंद्रांची पूर्ण पत्त्यासही माहिती पुढील प्रमाणे आहे. त्या ठिकाणी जावून आधार कार्डाची पूर्तता करण्यात यावी असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.