सिटी बेल लाइव्ह । प्रतिनिधि । आवरे ।
साहसी लोकांना भाग्य नेहमीच साथ देत असते विद्वान सर्वत्र पुज्यत्ये कु रश्मी मनोहर म्हात्रे हिने शैक्षणिक वर्ष 2019 -2020 या वर्षात मुंबई विद्यापीठ कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत प्रणिशास्त्र या विषयात वीर वाजेकर महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे.
कु रश्मी ही लहानपणी पासून चाणाक्ष अशी बुद्धी म्हणजे प्रगल्भ बुद्धिमता लाभलेली विद्यार्थ्यांनि होय लहानपणी पासून हे काय कस कुठ केव्हा अस स्वतःच्या मनाला प्रश्न विचारणारी होय सदर मिळविले ल्या यशाचे श्रेय तिने आई वडील गुरुजन याना दिलं आहे भविष्यात तिने I A S होण्याच स्वप्न उराशी बाळगलं आहे तरी त्या दिशेने वाटचाल चालू ठेवण्याच प्रयत्न करणार आहे तरी तिने मिळविल्या या यशासाठी सन्मानीय स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर पुण्यतिथी निमित्ताने घेण्यात आलेल्या सुयश क्लासेस आवरे च्या कार्यक्रमात कु रश्मी मनोहर म्हात्रे हिचा सन्मान चिन्ह , प्रशस्ति पत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सुयश क्लासेस आवरे ची विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रश्मी म्हणाली की आपलं ध्येय निश्चित करा प्रसंगीप्रसंगी निराबाई पाटील आवरे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच , सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर ,श्री सुनील जी ठाकूर , श्री शिवकुमार म्हात्रे , श्री रोहित जी पाटील व श्री निवास गावंड सर व सुयश क्लासेस आवरे चे सर्व विद्यार्थ्यांनि यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.








Be First to Comment