सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
विविध राज्यात क्रिकेट खेळात चमकलेल्या रसायनी परीसरातील चौदा खेळाडूंचा शिवनगरमध्ये माजी सरपंच संदिप मुंढे यांच्यावतीने जाहीर सत्काराचा कार्यक्रम पार पडला.
क्रिकेट खेळात आपल्या कामगिरीने खेळी करून रसायनीतील रजत मुंढे, योगेश जांभले, भावेश कुरंगले, हार्दिक कुरंगले, शंकर पारंगे, गणेश पारंगे,मयूर पाटील,मनिष तातरे,शुभम नाईंक, प्रशांत पवार, अमित म्हात्रे, अखिल भोईर, संदेश मुंढे, शार्दुल चौधरी यांचा सन्मानचिन्ह, क्रिकेट टि शर्टं व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
रसायनीतील या चौदा क्रिकेट खेळाडूंनी राज्यातील विविध शहरांची मैदाने बहारदार क्रिकेट खेली करून गाजवली आहेत.यातील चांभार्ली येथील रजत मुंढे या खेळाडुने कर्नाटक, अमरावती, नाशिक, मुंबई आदी परीसरात मैदानात क्रिकेट खेळ करुन रसायनीला नावलौकिक मिळवून दिला आहे.त्याने कमी वयातच क्रिकेट खेळात नऊ दुचाकी जिंकल्या आहेत.तर २४० मॅन ऑफ दी मॅच,साठ मॅन ऑफ दी सिरीजचा मान त्याच्या नावावर आहे.
त्याच्याचप्रमाणे रसायनीतील इतर तेरा खेळाडूंनीही राज्यातील विविध मैदानावर क्रिकेट खेळ करुन चमकत आहेत.तर चांभार्ली येथील वेताळ क्रिकेट टिम जिल्ह्यात चर्चेंत आहे.मुंब ईतील अनेक क्रिकेट संघांना चांभार्ली वेताळ संघाने धुळ चारली आहे.या संघातील काही खेलाडूंचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रिकेट खेळाडू मयूर पाटील यांच्याकडून क्रिकेट खेळाबाबत जाणून घेतले असता,माजी सरपंच संदिप मुंढे हे नेहमीच आम्हाला क्रिकेट खेळण्यासाठी सहकार्य करीत असून रसायनी परीसरातील खेळाडूंच्या समस्या वेळोवेळी जाणून घेत आहेत, असे क्रिकेटर मयुर पाटील यांनी सांगितले.
रसायनी परीसरातील क्रिकेट क्षेत्रातील या चौदा खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा ठिकठिकाणी होत असल्याने त्यांचा सन्मान रसायनीतही व्हावा या हेतूने माजी सरपंच संदिप मुंढे यांनी खेलाडूंचा सत्काराचा कार्यक्रम केला. याप्रसंगी माजी उपसभापती देविदास पाटील, माजी सरपंच अशोक मुंढे, उपसरपंच राकेश खारकर, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दिपक कांबळी,रसगंगा पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश मालुसरे, कैलास म्हात्रे, नंदकुमार पाटील,उमेश मुंढे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, अनिल पिंगळे, योगेश लहाने, नामदेव कोंकंबे आदी मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment