Press "Enter" to skip to content

कै.द.ग.तटकरे जुनिअर कॉलेज कोलाड एच.एस.सी. निकाल ९३.०८% : उज्वल यशाची परंपरा कायम


सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )


फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या कै.द.ग.तटकरे ज्युनिअर कॉलेज कोलाड, एच.एस.सी.चा निकाल ९३.०८%लागला असून या कॉलेजच्या चांगल्या निकालाची परंपरा चालू ठेवत कॉलेज मध्ये सायन्स मधील ३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा निकाल ९६.९६%,वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थी ८९ शेकडा निकाल ८७.२५%,कला उत्तीर्ण विद्यार्थी ०८शेकडा निकाल ५०%, तर एमसीव्हीसी उत्तीर्ण विद्यार्थी १७ शेकडा निकाल ६८%लागला असून एकूण जुनिअर कॉलेजचा निकाल ९३.०८%लागला आहे.
सायन्स शाखेतून कल्पेश दलाराम कुमावत ८४.३०% गुण मिळवून प्रथम,स्नेहल नंदकुमार जायभाये ७९.६७% गुण मिळवून द्वितीय,राहुल सखाराम सोरेन ७४.७६%गुण मिळवून तृतीय,सोहम तात्यासाहेब जाधव७३.६९%गुण मिळवून चौथा,ईशाली विनोद साईगावकर,७२%तर वाणिज्य शाखेतून शिवानी संतोष शिंदे ७४% गुण मिळवून प्रथम,नितेश दत्ताराम बाईत७१.५३% गुण मिळवून द्वितीय, निकिता शंकर चिविलकर ६८.७६%गुण मिळवून तृतीय,सिया अनिल बिरगावले ६८%गुण मिळवून चौथा,प्रगती सखाराम भगत ६३.३८%गुण मिळवून पाचवा,कला शाखेतून शोभा नारायण कुंटे ५८.३०% गुण मिळवून प्रथम,प्रगती प्रभाकर सुतार ५०.७६ गुण मिळवून द्वितीय,काजल दिपक शिर्के ५०.७६%द्वितीय,नेहा सत्यवान पोटफोडे ५०.१५%गुण मिळवून तृतीय,सोनु बापु कापरे ४७.६९%गुण मिळवून चौथे,रविंद्र रामा भोईर ४७.२३%गुण मिळवून पाचवा आला आहे टेक्निकल शाखेतून सिदधांत सचिन चेणे६७.३८% गुण मिळवून प्रथम,सुमित सुनिल चावरेकर ६७.०७%गुण मिळवून द्वितीय,भुषण रामजी शिद ६०.३०%गुण मिळवून तृतीय,मनिष दिनेश मढवी ५९.३८%गुण मिळवून चौथा,गौरव आनेश अडलीकर ५७.३८%गुण मिळवून पाचवा क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून सर्वउत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य काळे सर,येरुणकर सर, केंद्र संचालक डी.आर पाटील सर, जी.डी.घोणे,तिरमले सर, देशमुख सर, घोसाळकर सर, अविनाश माळी,महाडिक सर इतर सर्व शिक्षक,कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.