श्री लक्ष्मीनारायण मंदिर जीर्णोद्धार करण्यात सुप्रसिद्ध उद्योगपती राजुशेठ गुप्ते यांचा सिंहाचा वाटा
400 वर्षे पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा” न भूतो न भविष्यती” असा झाला
राजू गुप्ते यांच्यावर उधळली समाजबांधवांनी स्तुतिसुमने.
सिटी बेल लाईव्ह/ पनवेल.
पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज पथावर असलेले श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे चारशे वर्ष पुरातन मंदिर आहे. या मंदिरातील श्री लक्ष्मीनारायण इच्छापुर्ती असल्याचे मानले जाते.चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या वतीने श्री लक्ष्मीनारायण मंदिर न्यास निर्माण करून या मंदिराची गेली अनेक वर्षे सेवा केली जात आहे.या पुरातन मंदिराचा आणि त्यालगतच्या सभामंडपा चा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने घेण्यात आला होता.सुप्रसिद्ध उद्योगपती राजू गुप्ते यांच्या मातोश्री श्रीमती कांता गुप्ते यांनी जीर्णोद्धार आपण करावा अशी इच्छा त्यांच्या सुपुत्रा जवळ प्रकट करताच राजू गुप्ते यांनी स्वखर्चाने श्री लक्ष्मीनारायण मंदिराचा जीर्णोद्धार करविला. दिनांक 10 जानेवारी रोजी राजू गुप्ते यांनी सपत्नीक विधिवत पूजन करून नूतन मुर्त्यांची प्राण प्रतिष्ठा केली.
शनिवारी सकाळी श्री लक्ष्मीनारायण मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या मुर्त्यांचे वेस दर्शन घडविण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. कोवीडचे निर्बंध असल्याकारणाने कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे या सोहळ्यादरम्यान काटेकोर पालन करण्यात आले.त्या नंतर मंदिराच्या नवीन वास्तूचा वास्तुशांती होम संपन्न झाला. पुण्याहवाचन करण्यात आले.मुर्त्यांच्या धान्य निद्रेने शनिवारच्या विधींची सांगता झाली.रविवारी सकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य विधींना प्रारंभ करण्यात आला. यात मुख्यत्वे होम, मूर्ती स्थानापन्न विधि, कलशा रोहण,ध्वजारोहण,महाआरती,महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. राजू गुप्ते यांनी त्यांच्या पत्नी मुक्ता यांच्यासह सर्व विधी पूजन केले.न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाच्या या सोहळ्यामध्ये पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजातील तमाम बांधव सहभागी झाले होते. तसेच या नेत्रदीपक सोहळ्याचा आनंद अन्यधर्मीय बांधवांनी देखील घेतला.
राजू गुप्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की स्वर्गीय विश्वस्त राजेश राजे यांची आज प्रकर्षाने आठवण येत आहे. या मंदिराचे मूर्त स्वरूप साकारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले होते. तसेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभु सभा समाजाचे तमाम विश्वस्त समाज बांधव, हितचिंतक या सार्यांनी आपापले योगदान दिल्यामुळेच हे शक्य झाले.हर्ष गुप्ते यांच्या कल्पनेनुसार आणि धर्मशास्त्राचे पालन करत मंदिराच्या नूतन वास्तूचे बांधकाम करण्यात आले आहे.
राजू गुप्ते यांनी त्यांच्या मातोश्रींच्या इच्छेनुसार जिर्णोधार सोहळ्यामध्ये सिंहाचा वाटा दिल्यामुळे आज नेत्रदीपक स्वरूपातील हे पुरातन मंदिर नवी झळाळी घेऊन उभे राहिले आहे. राजू गुप्ते यांनी सढळ हस्ते मदत केल्यामुळेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे भव्य असे मंदिर नावारूपास आल्याने समाजबांधव त्यांच्या वरती स्तुतिसुमने उधळत आहेत.सायंकाळपासून दर्शनासाठी खुल्या झालेल्या मंदिरामध्ये पनवेलमधील अनेक नामवंत दिग्गजांसह मान्यवरांनी श्री लक्ष्मीनारायण यांचे मनोभावे दर्शन घेतले.



चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्यावतीने गेली अनेक दशके या मंदिरामध्ये कृष्ण जन्माष्टमी सोहळा, गणेशोत्सव, श्रीराम जन्म सोहळा असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात तसेच राम गणेश गडकरी, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह समाजातील दिग्गजांचे जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम केले जातात. प्रतिवर्षी समाजातील नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे सन्मान देखील केले जातात.







Be First to Comment