खालापुरात शिक्षकांनी केला क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या विचारांचा जागर
सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
सावित्रीबाईंच्या विचारांचा वसा आणि वारसा सर्वांनी जपला पाहिजे, वाढवला पाहिजे असे आवाहनही खालापूर गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब पोळ यानी शिक्षक संघाच्या वर्धापनदिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केले.खालापूर प्राथमिक शाळेत वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होत.
यंदा पासून साविञीबाई फूले जयंती राज्य सरकारच्या आदेशानुसार महिला शिक्षण दिन म्हणून साजरा होत असल्याने विशेष आनंद शिक्षकांमध्ये होता. महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना भाऊसाहेब पोळ यांनी संघटनेने सावित्रीबाईंचा जागर केल्याबद्दल अभिनंदन केले.
नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक यश मिळवून तालुक्याची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी शिक्षकांना प्रेरित केले.संघटना राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे पोळ यानी कौतुक केले. खालापुरातील जिल्हा परिषद महिला शिक्षकांनी सावित्रीबाई यांच्या जीवनातील विविध पैलु उघडत सावित्रीबाईंचे चरित्र श्रोत्यांसमोर मांडले.महिला शिक्षकांसोबत विद्यार्थिनींची भाषणे प्रभावी झाली. सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थिनींनी उपस्थितांची मने जिंकली.सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी अभ्यासपूर्ण व्याख्यान देणाऱ्या प्राथमिक शिक्षिका रंजना देशमुख शाळा वडवळ, अनिता शिरोळे- बांदल शाळा तुरमाळ, कांचन देशमुख शाळा देवन्हावे, अर्चना दुर्गे शाळा वडविहीर बौद्धवाडी यांचा गौरव करण्यात आला.
वनवे निंबोडे शाळेची विद्यार्थिनी वेदिका नितीन पारठे , कोमल सुधाकर राठोड शाळा देवन्हावे खालापूर तालुक्यात शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यश मिळविलेल्या पार्थ मोहन धारणे व परखंदे शाळेची पुनम किसन वाघमारे आणि मार्गदर्शक शिक्षक उमेश म्हात्रे, नागेश बंडगर ,मुख्याध्यापक जयंत पाटील,रामेश्वर खाटीकमारे यांचा संघटनेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ विस्तार अधिकारी आशा खेडकर ,संघटनेचे अध्यक्ष उमेश विचारे, सरचिटणीस दिपक पालकर, संघटना नेते दिलीप देशमुख , अनंत ठाकूर, केंद्रप्रमुख राजन पाटील , पेण पतपेढीचे माजी संचालक जयंत पाटील,शाळा व्यवस्थापन समिती खालापूरचे मिलिंद भोसले, दिनेश फराट,संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
खालापूर तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात.प्रशासनाचे देखील सहकार्य मिळत असते.यंदा शासनाने साविञीबाई फूले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा घेतलेला निर्णयाचे स्वागत आहे.
उमेश विचारे, अध्यक्ष शिक्षक संघ खालापूर











Be First to Comment