पत्रकारांचा सन्मान पालिकेने करायला हवा होता पत्रकारांनी केली खंत व्यक्त
सिटी बेल लाइव्ह । खोपोली । संतोषी म्हात्रे ।
अविष्कार फाउंडेशन खालापूर तालुका शाखेतर्फे विविध वर्तमानपत्र,साप्ताहिक वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात केले आहे. तर कोरोना काळात पत्रकारांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत वृत्तसंकलन करीत शासनाची उपाययोजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य सातत्याने केले दरम्यान अनेकांना कोरोना विषाणूंनी लागण झाली अशा सर्व निर्भिड पत्रकारांचा नगरपालिकेने छोटेखानी कार्यक्रम घेत सन्मान करायला हवा होता अशी खंत पत्रकारांनी व्यक्त केली.
अविष्कार फाउंडेशन खालापूर तालुका शाखेतर्फे पत्रकारांचा सन्मान सोहळा शिळफाटा येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित केले होते.या कार्यक्रमासाठी पालिकेच्या नगराध्यक्ष सुमन औसरमल,उपनगराध्यक्षा विनिता कांबळी,शिवसेना शहर प्रमुख नगरसेेेवक सुनिल पाटील,स्थानिक नगरसेविका वनिता काळे, शिव सहकार सेना शहर अध्यक्ष हरीश काळे,संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फक्के ,कविता खोपकर आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नगराध्यक्ष सुमन औसरमल यांनी सर्व पत्रकार यांचे अभिनंदन करताना पत्रकार अहोरात्र काम करून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम करीत असतात,अनेकदा लोकप्रतिनिधींना आपल्या वृतांतून चिमटे काढून दिशा दाखवण्याचे काम करीत असतात त्यामुळेच आम्हाला आमच्या चुका समजतात व त्याबाबत आम्ही दखल घेत असतो असे त्यांनी सांगितले, उपनगराध्यक्ष विनिता कांबळे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर वर्तमानपत्रात येणार्या टीकेबद्दल मन विचलित होत असे ,पण त्यानंतर मात्र त्यांच्या टीकेची दखल घेत आम्ही आमच्या कामात बदल केले ,वर्तमान काळात पत्रकारांनी दाखविलेल्या चुका याची पण दखल घेत कामात सुधारणा केल्या पत्रकारांचे काम दीपस्तंभासारखे आहे चांगल्या कामाची पण पत्रकार दखल घेत असल्याबद्दल आभार व्यक्त करताना, सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.गटनेते सुनिल पाटील यांनीही पत्रकार यांच्या कामगिरीचे कौतुक केले खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यात काम करत असतान पत्रकार मित्राचे खूपच सहकार्य व मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले.
अविष्कार फाऊंडेशनचे खालापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र फक्यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या पहिला चा कार्यक्रम आहे व आम्हाला पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित पत्रकार यांचे त्यांनी आभार व्यक्त करीत पुढे ही पत्रकारांनी आपल्या लेखणीने समाज प्रबोधन व न्याय देण्याचे काम करावे अशी इच्छा व्यक्त केली. पत्रकारांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात ज्येष्ठ पत्रकार रवींद्र घोडके व जगन्नाथ ओव्हाळ यांनी आपले विचार व्यक्त केलेयानंतर उपस्थित सर्व पत्रकारांना प्रशस्तीपत्रक व भेट वस्तू देण्यात देण्यात आली .
या कार्यक्रमाचे जितेंद्र देशमुख यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन पत्रकार उपाध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी केले








Be First to Comment